राजकीय

वैजापूर मध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का.

माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकरांनी शिवसेनेला ठोकला राम राम.

वैजापूर : गेल्या काही दिवसांपासून वैजापूरचे ठाकरे सेनेचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे नाराज असल्याची चर्चा होती. आणि अखेर चिकटगावकरांनी ठाकरेंच्या सेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. तशी घोषणा देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मागील महिन्यात आदित्य ठाकरेंच्या वैजापूर येथील झालेल्या मेळाव्याला
अनुपस्थित राहिल्याने वैजापूर मतदार संघाचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर नाराज असल्याची चर्चा मतदारसंघात होती. आज (दि.१०) वैजापूर शहरात आयोजीत कार्यकर्त्यांचे मेळाव्या नंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारल्याने पक्ष सोडत असल्याची घोषणा यावेळी चिकटवाकरांनी केली. तसेच येणाऱ्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा मनोज जरांगेंनी उमेदवारी दिल्यास त्यांच्याकडून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर मला पक्षात घेतांना जिल्हाप्रमुखांनी मला आमच्याकडे प्रबळ उमेदवार नसून तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला विधानसभेचे तिकडे देऊ असे असे सांगण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी भेटल्यानंतर मला उमेदवारी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने मी हा निर्णय घेत आल्याचे
चिकटगावकरांना स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात चिकटगावकर का निर्णय घेतात हे पहाणे महत्त्व असणार आहे.

कोण आहेत भाऊसाहेब चिकटगावकर?

भाऊसाहेब चिकटगावकर हे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.तर २०१४ मध्ये मोदी लाटेत निवडून येणारे छत्रपति संभाजीनगर जिल्ह्यातील चिकटगावकर राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे चिकटगावकर हे ठाकरेंच्या सेनेमध्ये आले होते.काही काळ शरद पवारांचे निकटवर्तीय व एकनिष्ठ म्हणून त्याची ओळख होती. सहा वर्षापूर्वी मराठा अंदलोनासाठी. वैजापूर – गंगापूर मतदार संघातील काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी बलिदान दिल्यानंतर हे आंदोलन राज्यभर पेटले होते. त्याला आंदोलनाला पाठिंबा म्हणुन आमदारकीचा राजीनामा देणारे चिगटगावकर हे राज्यातील दुसरे आमदार होते. चिगटगावकर यांचा तालुक्यात मोठा चाहता वर्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button