वैजापूर : महक स्वामी यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात अधिकारी कर्मचारी झाले भावुक..
वैजापूर पुढारी वृत्तसेवा : सरकारी अधिकारी म्हटलं की बदली , बढती आलीच. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, त्यांची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक.यांसारख्या बऱ्याच गोष्टीची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन् त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. अशाच एका ‘ लेडी सिंघम ‘ आणि जिगरबाज’ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अधिकारी यांचा वैजापूर मध्ये झालेला निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला. निमित्त होते पोलीस उपविभागीय अधिकारी महक स्वामी यांची नागपूरला बदली झाल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यात आयोजीत केलेला निरोप समारंभ, महक स्वामी यांनी जवळपास दोन वर्ष कर्तव्यदक्ष म्हणुन केलेल्या कामाबद्दल.
वैजापूर तालुक्यातील वैजापूर ,वीरगाव, शिऊर या तिन्ही ठाण्याचा चा उपविभागाचा पोलीस दलाचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी थेट संपर्क, तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच वैजापूर मागिल महिन्यात ज्या पद्धतीने दोन गटात तणाव निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरा सह ग्रामीण भागात शांतता प्रस्थापित करण्याला महत्व दिले होते. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते. स्वामी या बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही. मात्र त्यांनी निरोप समारंभामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना संपूर्ण वैजापूर हे माझ्या नोकरीचे गुरु आहे. अशा पद्धतीने सुरू केलेल्या मनोगताने अनेकांचे मन जिंकले यावेळी त्यांनी तालुक्यातील अनेक प्रसंग सांगितले . या कार्यक्रमाला वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे, मा .नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, मा. नगराध्यक्ष अकील शेठ, पो. नि. शामसुंदर कौठाळे, स. पो. नि. शंकर वाघमोडे, स .पो.नि.वैभव रनखांब यांच्या सह वैजापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..